युरिपिडस (ग्रीक, अंदाजे इ.स.पू. ४८० – अंदाजे इ.स.पू. ४०६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी युरिपिडस हा कालानुक्रमे शेवटचा लेखक होता (एशिलस व सॉफोक्लीस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ९२ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सतरा आज ज्ञात आहेत.