मराठी साहित्यांत राम गणेश गडकरी ह्यांना जेवढी कीर्ति आणि लोकप्रियता मिळाली, तेवढी महाराष्ट्रामधल्या या शतकांतल्या फारच थोड्या लेखकांच्या वांट्याला आली असेल. महाराष्ट्राने त्यांच्या गुणांचें जेवढें कोडकौतुक केलें तेवढें कोणत्याहि मराठी लेखकाचें केलेलें नाहीं. काव्य, नाट्य आणि विनोद ह्या तीनहि क्षेत्रांत ते सारख्याच वैभवानें आणि तेजानें तळपले. ह्यापैकी केवळ एकाद्याच क्षेत्रांत ते वावरले असते तरी त्यांनीं तेवढेंच यश मिळविलें असतें. पण साहित्यामधल्या अत्यंत अवघड म्हणून समजल्या जाणाऱ्या त्या तीनहि क्षेत्रांमध्ये एकाच वेळीं त्यांनीं असामान्य प्रभुत्व मिळविलें, म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती अद्‌भुततेचें विलक्षण वलय निर्माण झालें. त्यांच्या काव्याने, नाट्यानें आणि विनोदानें महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलें.

संपूर्ण गडकरी खंड १

संपूर्ण गडकरी खंड २