Author: natak

शेक्सपिअर परिचय ग्रंथ

शेक्सपिअरच्या जन्माला इ.स. १९६४ मध्ये ४०० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी सर्व जगभर झालेल्या उत्सवावरून या अद्वितीय नाटककाराची मोहिनी जनमानसावर किती आहे हे दिसून आले. प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणावर त्याचे वाड्मय व चरित्र याबद्दल चर्चा करण्यात आली. इंग्लिज्ञ बोलणाऱ्या देशांत व विशेषतः इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत गौरवग्रंथ निर्माण झाले, शेकडो व्याख्याने, परिषदा वगैरे कार्यक्रम घडून आले व आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या साहित्यसम्राटाची कीर्ती सामान्य लोकांच्या कानांवरही सारखी पडत राहिली.

Read More

रस–भाव–विचार

भरतमुनींच्या “नाट्यशास्त्रातील” अध्याय
६व ७ यांचे “अभिनवभारती”
टीकेसह सटीप मराठी भाषांतर

भाषांतरकार : प्रा. र. पं. कंगले

Read More

संपूर्ण गडकरी

नाटककार, विनोदी लेखक आणि कवी म्हणून ख्यातनाम असलेले राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे सर्व साहित्य मराठी वाङमयाचे भूषण मानले जाते. गेली जवळजवळ शंभर वर्षे या थोर
साहित्यकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले वाड्मय महाराष्ट्राने शिरोधार्य मानलेले आहे. आजही त्यांच्या साहित्याची लोकप्रियता अणूमात्र कमी झालेली नाही.

Read More